राजकीय नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती सार्वजनिक करा – सुप्रीम कोर्टाचे आदेश

New Delhi
supreme court
सुप्रीम कोर्ट

राजकीय पुढाऱ्यांवरील दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी गुन्हे दाखल असलेल्या पुढाऱ्यांना उमेदवारी का दिली? त्याची कारणे आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याची माहिती वृत्तपत्र, वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यास कोर्टाने सांगितले आहे.