Live : मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी – ओवेसी

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे.

New Delhi
Ayodhya land case : sc asks mediation panel to submit report by july 25
अयोध्या प्रकरण

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल जाहीर केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तसेच ५ एकर जमीन देण्यात येणार आहे. या निकालाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या निकालाचे कौतुक केले आहे.


हो कोणाचा विजय तर कोणाचा पराजय नाही – मुख्यमंत्री

  • महाराष्ट्रातील जनता शांतता कायम ठेवेल
  • कोर्टाचा निर्णय सर्वांनी स्वागत करावे
  • नव्या भारतासाठी सर्व जण निर्णयाचा आदर करतील

५ एकर जमिनीची खैरात मुस्लिमांना नको – ओवेसी


  • सर्वांनी सदभाव आणि सयंम पाळावा – मोदी
  • सर्वांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला – मोदी
  • अयोध्येप्रकरणी कोर्टाच्या निर्णयाने न्याय मिळाला – मोहन भागवत
  • जय, पराजय म्हणून निर्णयाकडे पाहू नये – मोहन भागवत
  • संयमाने लोकांनी आनंद व्यक्त करावा – मोहन भागवत
  • भूतकाळ विसरुन पुन्हा एकत्र यावे – मोहन भागवत

आजचा ऐतिहासिक निकाल असून या निर्णयाचे कौतुक करा – शरद पवार

‘निकालाचा सर्वांनी आदर करायला हवा. हा वाद निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचा उपयोग होईल. त्यामुळे शांतता आणि संयम बाळगावा’.


आज बाळासाहेब हवे होते – राज ठाकरे

देशभरात अयोध्या निकालावरून प्रतिक्रिया येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधलं जावं. पण यावेळी फक्त एकच वाटतं, यावेळी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली. 


मंदिराची दारे उघडल्यानं भाजपाच्या राजकारणाची दारे बंद झाली : काँग्रेस

‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूनं आहोत. या निर्णयानं फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत’ – काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला


निर्णय स्वीकारून शांतता राखावी – नितीन गडकरी

न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा आणि शांतता राखावी, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.