घरदेश-विदेशकोरोनो मृतांच्या कुटुंबीयांना हिरा व्यापाऱ्यांचा मदतीचा हात

कोरोनो मृतांच्या कुटुंबीयांना हिरा व्यापाऱ्यांचा मदतीचा हात

Subscribe

कोरोना विषाणूमुळे देशभरातील लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळे लोक नैराश्यात गेले असून आत्महत्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर सूरतच्या हिरा व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

डायमंड इंडस्ट्री करियर फाऊंडेशनने (DICF) मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची योजना आणली आहे. अमेरिकेच्या या फाऊंडेशनशी संबंधित व्यक्तींनी कोरोनोमुळे हिरा उद्योगात नोकरी गमावल्यानंतर आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत अधिसूचना जारी केली असून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी असं आवाहन मृतांच्या कुटुंबांना करण्यात आलं आहे. अशा कुटुंबांना १०,००० ते ३५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

- Advertisement -

निलेश बोडके या व्यावसायिकाने सांगितलं की, “आम्ही १०,००० ते ३५,००० रुपयांची मदत देत आहोत. आम्ही अशा ३७ कुटुंबांचे सर्वेक्षण केलं असून ३२ कुटुंबांना मदत दिली.” काही लोकांना रेशनची आवश्यकता असते, म्हणून आम्ही त्यांना सहा ते सात महिने रेशनही पुरवत असल्याची माहिती दिली. फाऊंडेशनकडून आर्थिक मदत व अन्न मिळालेल्या मृताच्या कुटूंबातील सदस्यांपैकी एकाने सांगितलं की, या फाउंडेशनने या कठीण परिस्थितीत त्याच्या कुटुंबासाठी मदत केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -