Video : …आणि गरबा खेळतानाच त्याला आला मृत्यू

राजस्थानमधील माउंट अबू येथे एका व्यक्तीचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajasthan
surat navratri festival fatal for a person death due to falling while playing garba in mount abu
गरबा ठरला जीवघेणा

नवरात्रोत्सव म्हटला की गरबा दांडियाची धूम ही आलीच. मग बरीच मंडळी खास गरबा खेळण्यासाठी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी देखील जातात. मात्र, हा गरबा खेळणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील माउंट अबू येथे घडल्याचे समोर आले आहे. जगदीश असे या व्यक्तीचे नाव असून गरबा खेळताना अचानक ही व्यक्ती खाली कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

गरबा खेळताना आला मृत्यू

गरबा खेळताना आला मृत्यू

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 2019

 

नेमके काय घडले?

गुजरात येथे राहणारे जगदीश आपल्या पत्नी आणि मित्रांसह सुरत येथील माउंट अबू येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार; रविवारी ते देवदर्शन करुन हॉटेलमध्ये आले. दरम्यान, त्या ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जगदीशसह त्यांचे मित्र देखील गरबा खेळण्यासाठी त्याठिकाणी गेले आणि त्यांनी गरबा खेळण्यास सुरुवात केली. मात्र, गरबा खेळताना अचानक जगदीश खाली कोसळले. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे जगदीशच्या मित्रांना मोठा धक्का बसला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – नवरात्रौत्सवाला राजकीय रंग; गरबा दांडीयातून रंगणार मतांचे राजकारण!