घरताज्या घडामोडीसुशांतची बहिणच औषधातून ड्रग्ज द्यायची; संपत्तीसाठी कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं?

सुशांतची बहिणच औषधातून ड्रग्ज द्यायची; संपत्तीसाठी कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं?

Subscribe

सुशांत सिंह राजपूत प्रकरण गेले काही दिवस चर्चेत नव्हते. एनसीबीने सुरु केलेली ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आणि कंगना रणौत वैगरे मंडळींनी घातलेला गोंधळ यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचे पुढे काय झाले? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यातच AIIMS चा अहवाल सीबीआयला प्राप्त झाला आणि यावर पुन्हा एकदा राजकीय धुमश्चक्री सुरु झाली. त्यातच आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. सुशांतची बहिण बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आरोप केला आहे की, सुशांतच्या कुटुंबियांनी प्रॉपर्टीसाठी त्याला नैराश्यात ढकलून आत्महत्येसाठी प्रवृत्त केले.

आयुक्त परमबीर सिंग आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मितू सिंह यांनी मुंबई हायकोर्टात त्यांच्यावर झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीने ७ सप्टेंबर रोजी या दोघींविरोधात सुशांतला चुकीची औषधे दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा रद्द व्हावा, यासाठी सुशांतच्या बहिणींनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि एम.एस. कर्णिक यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी १३ ऑक्टोबर ही तारीख आज दिली.

- Advertisement -

तत्पुर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले होते की, सुशांतची बहिण दिल्लीतील डॉक्टरांच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला Anxiety वरील बंदी असलेले औषध देत होत्या. यासंबंधी रिया चक्रवर्तीने दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर सीबीआय लवकरच तपास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुशांतला दिली जाणारी औषधे Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act, 1985 या कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आलेली आहेत. या प्रकरणात रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींसोबत दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर. तरुण कुमार यांचेही नाव तक्रारीत घेतलेले आहे.

तर दुसरीकडे हाच धागा पकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निशाणा साधला आहे. “मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते. सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला त्याच्या कुटुंबीयांनी प्रवृत्त केले का याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा अशी मी पोलीस आयुक्त @CPMumbaiPolice यांच्याकडे मागणी करतो.”, असे ट्विट सरनाईक यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -