Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी Sushant Singh Rajput प्रकरण आता ‘महाराष्ट्र विरुद्ध बिहारी’ वळणावर

Sushant Singh Rajput प्रकरण आता ‘महाराष्ट्र विरुद्ध बिहारी’ वळणावर

Patna
SushantSingh Rajput Sushilkumar Modi Uddhav Thackeray

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आधी नेपोटिझमवरुन रंगलेली चर्चा आता राजकारणावर आली आहे. एकाबाजुला या प्रकरणाचा मुंबई आणि बिहार पोलीस समांतर तपास करत असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तर महाराष्ट्रात गेलेल्या बिहारमधील पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून सुशांतसिंग बिहारचा असल्यामुळे महाराष्ट्रा पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की, “महाराष्ट्रात याआधीदेखील बिहारी जनतेसोबत दुर्व्यवहार झालेला आहे. मात्र आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टेकूवर बसलेले उद्धव ठाकरे सरकारने तर हद्दच केलीये. लॉकडाऊनमध्ये देखील बिहारी मजूरांना परत पाठविण्यावरून महाराष्ट्राने अडेलतट्टू भूमिका घेतली होती. आता बिहारचा पुत्र सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत नाहीये”

सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटरवर याविषयी अनेक ट्विट केले आहेत. “अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे कोट्यवधी बिहारवासी दुःखात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी सर्वांचीच मागणी आहे. बिहार सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाते कव्हेट दाखलकरुन रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बिहार पोलिसांचा पक्षही विचारात घ्यावा, अशी मागणी केली आहे. सुशांतला न्याय देण्यासाठी बिहार सरकारची कोणत्याही स्थराला जाण्याची तयारी आहे.”, अशी भूमिका मोदी यांनी मांडली आहे.

हे वाचा – Sushant Suicide Case: मुंबईत बिहार पोलिसांचा संमातर तपास सुरु

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here