घरदेश-विदेशसुषमा स्वराज यांचा ट्विटरवर रेकॉर्ड

सुषमा स्वराज यांचा ट्विटरवर रेकॉर्ड

Subscribe

ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये सुषमा स्वराज या सर्वात जास्त फॉलोअर्स मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

सोशल मीडिया हे जगभर महत्त्वाचं माध्यम समजलं जातं. त्यातही ट्विटर फॉलोअर्सची संख्यादेखील जास्त आहे. ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा क्रमांक लागला असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या जगभरातील पहिला महिला ठरल्या आहेत. बीसीडब्ल्यू एजन्सीनं दिलेल्या अहवालानुसार सुषमा स्वराज यांनी ट्विटर फॉलोअर्सच्या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

सुषमा स्वराज यांचे १.१. कोटी फॉलोअर्स

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या फॉलोअर्सची संख्या १.१. कोटीपर्यंत पोहचली आहे. ही संख्या कोणत्याही ट्विटर वापरणाऱ्या महिलेची नाही. जगभरातील पूर्ण यादीमध्ये सुषमा स्वराज यांचा सातवा क्रमांक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा क्रमांक आहे. यासंदर्भात सुषमा स्वराज यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येदेखील नोंदण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यामातून बऱ्याच लोकांची मदत केली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुषमा स्वराज यांच्याकडून बऱ्याच वेळा मदत करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या क्रमांकावर

‘ट्विलोमसी’ अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विटर फॉलोअर्स संख्या ही जगभराचा अहवाल घेतल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या वैयक्तिक अकाऊंटला ४.२ कोटी फॉलोअर्स असून अधिकृत अकाऊंटवर २.६ कोटी फॉलोअर्स आहेत. तर या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ५.२ कोटी फॉलोअर्सच्या संख्येनं पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पोप फ्रान्सिस ४.७ कोटी फॉलोअर्ससह आहेत. तर सौदी अरबच्या शाह सलमानच्या ट्विटला सर्वात जास्त रिट्विट केल्याचा रेकॉर्ड आहे. शाह सलमाननं केवळ ११ ट्विट केले असून त्याला १,५४,२९४ रिट्विट मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -