घरदेश-विदेशसुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले

सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले

Subscribe

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर एक महिन्यांनी त्यांनी सरकारी निवासस्थान सोडले. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. परंतु, गेल्या पाच वर्षात त्यांनी परराष्ट्रीय मंत्री म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पाडली. निवडणुकीनंतर मोदी सरकारची पुन्हा सत्ता आली असून नव्या सरकारचा शपविधी सोहळा एक महिन्यापूर्वी पार पडला आहे. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले आहे.

काय म्हणाल्या सुषमा स्वराज?

सुषमा स्वराज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंबंधीची माहिती दिली आहे. ‘८, सफदरजंग लेन येथील सरकारी निवासस्थान मी सोडले असून आधीचा पत्ता आणि फोन नंबरवर उपलब्ध राहणार नाही’, अशी माहिती सुषमा यांनी आपवल्या ट्विटमध्ये दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -