कॅनडा ब्लास्ट; भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांची हेल्पलाईन

bombay_bhel
बॉम्बे भेल रेस्टॉरंट

१५ जण जखमी, ३ गंभीर, हा घातपाताच

कॅनडामधील टोरँटो येथील बॉम्बे भेल या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये गुरूवारी रात्री स्फोट झाला. या भीषण स्फोटानं टोरँटो हादरलं आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आतापर्यंत १५ जण जखमी झाले असून त्यामध्ये ३ जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे टोरँटो मधील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांनी येथील भारतीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. तसेच टोरँटोमधील संपुर्ण परिस्थितीवर आपले लक्ष असल्याचेही त्यांनी ट्विटरवरून सांगितले.

स्फोटामधील जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पील रिजनल पॅरामेडिक सर्व्हिसनं (स्थानिक पोलिसांनी) ट्विट करत सांगितलं की, ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री १०.३० वाजता हा स्फोट झाला आहे. परंतु स्फोटामागाल कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुष्मा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी टोरँटोमधील कॉन्सूल जनरल यांच्यासोबत संपर्कात आहे. टोरँटोमधील इंडियन हाय कमिशनसोबत या विषयी मी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत सरकार टोरँटो मधील भारतीयांची मदत करेल.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here