घरCORONA UPDATEधक्कादायक! संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह तीन तास बस डेपोत

धक्कादायक! संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह तीन तास बस डेपोत

Subscribe

कोरोनाची चाचणी केली होती, त्याचा अहवाल येणं बाकी होता

कोरोना विषाणूने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. यापूर्वी कोरोना रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात फेकून देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, कर्नाटकमध्येही पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. एका संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह तीन तास बस डेपोमध्येच पडून असल्याचं वृत्त आहे. याबाबतचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे.

ज्या व्यक्तिचा मृत्यू झाला तो कोरोनाचा संशयित रुग्ण होता. मृत व्यक्ती कर्नाटक येथील रानीबेन्नूर तालुक्यातील रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. २८ जून रोजी त्या व्यक्तीची कोरोना तपासणी झाली. चाचणीचा अहवाल घेण्यासाठी दोन दिवसांनी ती व्यक्ती पुन्हा रुग्णालयात आली. या व्यक्तीच्या अहवालाला वेळ लागणार असल्याने त्या व्यक्तीने रुग्णालय कर्मचाऱ्यांना जवळील बस आगारात थांबत असल्याचं सांगितलं आणि ती व्यक्ती आगारात जाऊन बसली. काही वेळाने आगारातच या व्यक्तीचा मृत्यू झाला. रुग्णालयाला याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयाचे काही कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला पीपीई कीटमध्ये गुंडाळलं आणि तो मृतदेह तिथेच ठेवून कर्मचारी तिथून निघून गेले. तब्बल तीन तास तो मृतदेह तसाच तिथे पडून होता. ही घटना पाहणाऱ्यांपैकी काहींनी व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा कर्मचारी तिथे आले आणि मग त्यांनी तो मृतदेह शवागारात नेऊन ठेवला. या प्रकरणावरुन रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -