सप्टेंबर महिन्यात काळ्या पैशांचा होणार पर्दाफाश; स्विस बॅंक माहिती देण्यास तयार

स्विस बँक भारतीय खातेदारांच्या खाते संबंधात माहिती देण्यास तयार झाली आहे. त्यामुळे या बँकेतील भारतीय खातेदारांच्या खातेसंबंधात खडानखडा माहिती मिळणार आहे.

swiss bank
सष्टेंबर महिन्यात काळ्या पैशांचा होणार पर्दाफाश; स्विस बॅंक माहिती देण्यास तयार

स्विस बँकेत जमा होणाऱ्या काळ्या पैशांची माहिती आता भारताला मिळणार आहे. कारण स्विस बॅंक भारतीय खातेदारांची माहिती देण्यास तयार झाली आहे. यासंदर्भात भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे भारतीय खातेदारांची माहिती देण्यास स्वित्झर्लंड देश तयार झाला आहे. स्विस बँक ३० सप्टेंबरच्या अगोदर भारतीय खातेदारांची माहिती देणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

बड्या राजकीय नेत्यांची होणार पोलखोल

भारतातील बडे राजकीय नेते आणि उद्योगपतींनी आपला काळा पैसा विदेशातील स्विस बॅंकेत लपवला आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर स्विस बॅंकेत कोणत्या नेत्यांनी किती पैसे लपवले आहेत, याची माहिती फिरत होती. मात्र, त्या माहितीच्या सत्यतेबाबत पडताळणी झाली नव्हती. दरम्यान, खरच राजकीय नेत्यांनी स्विस बॅंकेत पैसे लपवले असतील तर त्याची पुरेपुर माहिती भारताला मिळणार आहे. भारत सरकारने कित्येकदा स्विस बॅंकेकडून यासदंर्भातील माहिती मागितली होती. मात्र, स्विस बॅंकेने या संदर्भात माहिती देण्यास नकार दिला होता. आता दोन्ही देशांनी ऑटोमॅटिक एक्सचेंट ऑफ इन्फॉर्मेशन करारवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे भारताला स्विस बॅंकेतील भारतीय खातेदारांची खडानखडा माहिती मिळणार आहे. फॉरेन टॅक्सेशन अॅण्ड टॅक्स रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत भारताला सर्व अटी मान्य असून माहिती गोळा करण्यास भारत सज्ज झाला असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचे वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरावर सीबीआयचा छापा