घरदेश-विदेशमरकज प्रकरण: ८३ विदेशी नागरिकांविरोधात १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल

मरकज प्रकरण: ८३ विदेशी नागरिकांविरोधात १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल

Subscribe

दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात विदेशी नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज २० देशांतील ८३ परदेशी लोकांविरूद्ध १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल केलं आहे.

मरकज प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज २० आरोपपत्र दाखल केले. २० देशांतील ८३ परदेशी लोकांविरूद्ध १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल करण्यात आले. चार्जशीटमध्ये मरकज व्यवस्थापनेच्या भूमिकेचा उल्लेख तसंच तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली पोलिसांनी तीन वेगवेगळ्या विभागांत २० देशांतील ८३ विदेशी जमातींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यावर परदेशी कायदा, साथीचे रोग कायदा आणि आपत्ती कायदा कलम लावण्यात आलं आहे. साकेत न्यायालय १२ जून रोजी दोषारोपपत्राची दखल घेऊन त्यावर सुनावणी करणार आहे.

२० देश, २० आरोपपत्र

साकेत न्यायालयात अफगाणिस्तान, ब्राझील, चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, रशिया, अल्जेरिया, बेल्जियम, सौदी अरेबिया, जॉर्डन, फ्रान्स, कझाकस्तान, मोरोक्को, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम, फिजी, सुदान, फिलीपिन्स या देशातील नागरिकांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली गेली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?


मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ

या आरोपपत्रामुळे मौलाना साद यांच्या अडचणी वाढतील, कारण ज्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलं गेलं आहे अशा सर्व परदेशी जमातींच्या व्हिसा फॉर्ममध्ये निजामुद्दीन येथे असलेल्या जमातचा पत्ता देण्यात आला होता. म्हणजे तो मरकजच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी परदेशातून आला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -