घरदेश-विदेशहिंदी येत नाही म्हणून प्रवाशाला विमानतळावर अडवले

हिंदी येत नाही म्हणून प्रवाशाला विमानतळावर अडवले

Subscribe

तामिळनाडूतील प्रवाशाला हिंदी येत नसल्यामुळे त्या विमानतळावर अडवण्यात आल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर घडला आहे. या प्रवाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

हिंदी भाषा येत नसल्यामुळे एका तामिळनाडूतील प्रवाशाला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अडवले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाषा येत नसल्यामुळे त्याचे इमिग्रेशन नाकारण्यात आले असल्याचा आरोप या प्रवाशाने केला आहे. आपल्या अकाऊंवरुन या प्रवाशाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिले आहे. अब्राहम सॅम्युअल असे या प्रवाशाचे नाव आहे. सॅम्युअलने इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे. अधिकाऱ्यांशी अनेक वेळ हुज्जत घातल्यानंतर त्याला सोडण्यात आले. देशांतर्गत प्रवास करताना फक्त हिंदी येत नाही म्हणून अडवणे ही बाब पहिल्यांदाच घडली असल्याचे सांगितले आहे. सॅम्युअलला फक्त तमिळ आणि इंग्रजी भाषा येतात. सॅम्युअलचा भारतीय पासपोर्ट बघून त्याला हिंदी येत असल्याचे अधिकाऱ्यांना वाटले होते. 


काय केले ट्विट

“सीएसटी विमानतळावरील काऊंटर नंबर ३३ वर मला अधिकाऱ्यांनी अडवले. तमिळ आणि इंग्रजी मला येत होते मात्र हिंदी मला येत नाही. अशा मुजोर अधिकाऱ्यांवर सरकार काही कारवाई करेल का? हिंदी येत नाही म्हणून कोणालाही अधिकारी थांबवू शकत नाहीत. माझी फ्लाइट १ वाजताची असल्यामुळे मी विमानतळावर जास्त वेळ थांबू शकत नव्हतो.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -