घरदेश-विदेशहृदय शस्त्रक्रियेसाठी गोळा केलेला निधी ती केरळवासियांना देणार

हृदय शस्त्रक्रियेसाठी गोळा केलेला निधी ती केरळवासियांना देणार

Subscribe

तामिळनाडूची १२ वर्षाची अक्षया तिच्या दुसऱ्या हृदयरोग शस्त्रक्रियासाठी गोळा केलेला निधी केरळवासियांना मदत म्हणून देणार आहे. आतपर्यंत गोळा केलाला २० हजार निधीपैकी ५ हजार रुपये अक्षया केरळला मदत करणार आहे.

केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर केरळचे जीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यांच्या मदतीला देशभरातील अनेक राज्य धावून आले आहेत. त्याचसोबत अनेक सेलिब्रिटी, सामाजिक संस्था आणि एनजीओने देखील मदत केली आहे. एक १२ वर्षाची मुलगी पूराचा फटका बसलेल्या केरळ वासियांच्या मदतीला धावून आली आहे. अक्षयाने तिच्या उपचारासाठी जमा केलेला निधी केरळ पूरग्रस्तांना देणार आहे.

केरळची परिस्थिती पाहून दु:खी झाली

केरळमध्ये गेल्या काही आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराने केरळची अवस्था होत्याची नव्हती झाली आहे. तामिळनाडूच्या करुर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये १२ वर्षाची अक्षया राहते. केरळची परिस्थिती टीव्हीवर पाहून अक्षया दुखी झाली. अक्षयाला हृदयरोगाचा त्रास असून तिच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी अक्षयाने पैसे जमा केले होते. ते पैसे तिने केरळकरांना मदत म्हणून देणार आहे.

- Advertisement -

 केरळला ५ हजारांची करणार मदत

चांगले आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती लढत असतो. मात्र स्वत:ची काळजी न करता अक्षयाने पूरग्रस्त केरळकरांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. अक्षयाने तिच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आतापर्यंत २० हजार रुपये जमा केले होते. त्यापैकी तिने ५ हजार रुपये केरळवासियांना मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले आहे. अक्षयाला वडील नसून तिची आई जोथिमणी ही मजुरीचे काम करते. तीन मुलींसाठी तिची आई दिवसभर मजूरीचे काम करते.

“अक्षया केरळकरांना मदत करु इच्छित होती. आपण कशी मदत करु शकतो. असा प्रश्न मी तिला विचारला होता. पण कठिण परिस्थितीमध्ये मदत करणे गरजेचे असते. त्यामुळे थोडी का होईना मी मदत करेल यावर तिला खात्री होती. आणि अक्षयाच्या निर्णयासोबत आम्ही उभे राहिलो.” – अक्षयाची आई

अक्षयाला जन्मताच हृदयरोग

अक्षया ही तीन मुलीपैकी एक आहे जिला जन्मताच हृदयरोगाचा आजार असल्याचे समोर आले. तिचे वडीलांचे सहा वर्षापूर्वीच निधन झाले होते. अक्षया तिची आई आणि बहिणी आजी-आजोबांसोबत राहतात. अक्षयाला जन्माताच हृदयरोग असल्याचे आम्हाला माहिती होते. पण ती इतरांसारखी सामान्य आयुष्य जगू शकते असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले असल्याचे तिच्या आईने सांगितले.

- Advertisement -

नोव्हेंबर २०१७ ला झाली पहिली शस्त्रक्रिया

गेल्या वर्षी अक्षयाला हृदयारोगाचा त्रास होऊ लागला. तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. तसंच अचानक तिचे हृदय बंद पडू लागले होते आणि तिच्या शरिराला पूरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने तिचे शरीर निळे पडत चालले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी म्हणजे नोव्हेंबर २०१७ मध्ये तिच्या हृदयाची पहिली शस्त्रक्रिया झाली.

दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी गोळा करते पैसे

अक्षयाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तिच्या या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च करणे त्यांना कठिण होते. त्यामुळे तिच्या आईने नातेवाई आणि मित्र परिवाराकडे मदतीची मागणी केली. फेसबुकच्या माध्यमातूनही मदतीची मागणी केली. यासर्वांकडून जवळपास ३.५ लाख रुपये गोळा करण्यात त्यांना यश आले होते. आता अक्षयाची दुसरी शस्त्रक्रिया येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यासाठी २.५ लाखांचा खर्च होणार आहे. आम्ही पुन्हा तिच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीची मागणी केली असून आतापर्यंत २० हजार रुपये गोळा झाले आहेत. त्यामधून ५ हजार रुपये अक्षया केरळकरांना मदत म्हणून देणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -