घरदेश-विदेशतामिळनाडूत मुसळधार पाऊस; घरे कोसळून १७ जणांचा मृत्यू

तामिळनाडूत मुसळधार पाऊस; घरे कोसळून १७ जणांचा मृत्यू

Subscribe

या दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडत असून या मुळे मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात घरांवर भिंत पडून १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचादेखील समावेश आहे. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. या दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

अशी घडली घटना

कोइमबतोरपासून नादूर हे गाव ५० किमी अंतरावर आहे. सर्वजण गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच्या ५.३०च्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनाग्रस्त घराजवळ एक २० फूट उंचीची भिंत होती. ही भिंत या घरांवर पडली त्या धक्क्याने ही घरे कोसळली. घरांमधील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले होते. शेजाऱ्यांनी मेट्टूपलायम पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरु करुन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -