घरदेश-विदेशटाटा करणार जेट एअरवेजची खरेदी

टाटा करणार जेट एअरवेजची खरेदी

Subscribe

टाटा समुह कर्जामध्ये बुडालेल्या जेट एअरवेजची खरेदी टाटा ग्रुप करणार आहे. टाटा ग्रुप्सचे चेअमन एन. चंद्रशेखरन उद्या अर्थात शुक्रवारी बोर्ड सदस्यांसमोर जेट एअरवेजच्या अधिग्रहणाचा प्लॅन ठेवण्याची शक्यता आहे. यावेळी जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यास सहमती झाल्यास एव्हिएशन फिल्डमधील तिसरी सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल.

टाटा समुह! प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवलेलं नाव म्हणजे टाटा समुह. पण, आता टाटा समुह कर्जामध्ये बुडालेल्या जेट एअरवेजची खरेदी करणार आहे. ही डील सर्वात मोठी एव्हिएशन डील ठरणार आहे. टाटा ग्रुप्सचे चेअमन एन. चंद्रशेखरन उद्या अर्थात शुक्रवारी बोर्ड सदस्यांसमोर जेट एअरवेजच्या अधिग्रहणाचा प्लॅन ठेवण्याची शक्यता आहे. यावेळी जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यास सहमती झाल्यास एव्हिएशन फिल्डमधील तिसरी सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. यापूर्वी टाटा ग्रुपनं एअर आशिया आणि विस्तारामध्ये गुंतवणूक केली आहे. दरम्यान ५० टक्क्यांहून अधिक शेअर खरेदी करून जेटची मालकी मिळवण्याची टाटा ग्रुपची इच्छा आहे. जेटचे चेअरमन नरेश गोयल यांच्याकडे ५१ टक्के शेअर्स आहेत. टाटचनं गोयल यांच्याकडील २५ टक्के आणि शेअरधारकांकडील २६ टक्के शेअर्स खरेदी केल्यानंतर टाटांची जेट ऐअरवेजमधील भागिदारी ५१ टक्के होणार आहे.

सध्या जेट एअरवेजची किंमत २९२८ कोटी रूपये आहे. तर, जेटवर ८६ अब्ज एवढं कर्ज आहे. त्यामुळे टाटांशी डील केल्यास कर्जातून बाहेर पडण्यासाठी जेट एअरवेजला मदत होणार आहे. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणं देखील जेट एअरवेजला कठिण झालं आहे. त्यामुळे या डिलकडे आता उद्योगजगताचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -