घरCORONA UPDATEयाला म्हणतात सामाजिक बांधिलकी; कोरोनाशी लढण्यासाठी टाटा कडून १५०० कोटींची मदत

याला म्हणतात सामाजिक बांधिलकी; कोरोनाशी लढण्यासाठी टाटा कडून १५०० कोटींची मदत

Subscribe

कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून १५०० कोटीची मदत करण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यानंतर पुन्हा त्यात १००० कोटींची वाढ केली आहे.

- Advertisement -

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयीतल डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ते आपल्या जीवाची आणि कु्टुंबाची पर्वा न करत अहोरात्र झटत आहेत. संसर्गाचा धोका असल्यामुळे अनेकजण आपल्या घरी देखील जात नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना दोनवेळचे जेवणही व्यवस्थित मिळत नाही. अशावेळी टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलने मुंबईतील मेडिकल कर्मचारी, रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

 

रिलायन्स ग्रुपने मुंबईत पालिकेच्या मदतीने कोरोनासाठी स्पेशल १०० बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. महापालिकेच्या मदतीने फक्त दोन आठवड्यात हे हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलचे नाव देखील कोविड-१९ ठेवले आहे. मुंबई पालिका आणि ताज कॅटरर्स यांच्या अंतर्गत समन्वयातून भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले रुग्ण तसेच सर्व स्टाफच्या भोजनाची व्यवस्था ताज हॉटेलने केली आहे, असे ट्विट मुंबई पालिकेने केले आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ताज हॉटेलला या सेवेसाठी सलाम केला आहे. आरपीजी समूहाचे हर्ष गोयंका यांनीही टाटा समूहाचे कौतुक केले.


हेही वाचा – करोनाचे गांभीर्य गावकऱ्यांना समजले, लढवली ही अनोखी शक्कल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -