घरदेश-विदेशभारतीय संसदेत जेव्हा हिटलर अवतरतो!

भारतीय संसदेत जेव्हा हिटलर अवतरतो!

Subscribe

संसदेत आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आंध्र प्रदेशचे तेलगू देसम पक्षाचे खासदार आज प्रसिद्ध हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या वेशात आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा मान मिळावा, यासाठी त्यांना असा वेश धारण केल्याचे म्हटले जात आहे.

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देशातील ५५२ खासदार संसदेतील चर्चासत्रांमध्ये भाग घेत असतात. या चर्चासत्रांमध्ये बरेच वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप होतात. परंतू, या चर्चासत्रांमधूनही काही साध्य झाले नाही तर काही खासदार विविध मार्गाने आपले प्रश्न मांडतात. वेळप्रसंगी स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करतात. असाच काहीसा प्रकार एका खासदाराने केला आहे. भारतीय संसदेत हिटलर येऊ शकतो, याचा विचार कुणीच केला नसेल. संसदेत अचानक आलेल्या या हिटलरमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आज संसदेत साक्षात हिटलर यांचे आगमन झाले होते.

कोण आहेत ‘हे’ हिटलर?

आपल्या मागण्या किंवा आपण मांडलेल्या मुद्याची दखल घ्यावी म्हणून लोकप्रतिनिधी विविध तर्क लावतात. अशाच तर्कशुद्ध पद्धतीचा वापर करुन आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीचे खासदार साक्षात हिटलरचे रुप परिधारण करुण आज संसदेत हजर झाले. आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा सन्मान मिळावा यासाठी त्यांनी असा वेश धारण केल्याचे सांगितले आहे. त्यांनी परिधान केलेला हिटलरचा हा अनोखा वेश पाहून अनेक खासदार अचंबित झाले. हे हिटलर म्हणजे दूसरे तिसरे कुणी नसून आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे खासदार नरमल्ली शिवप्रसाद आहेत.

- Advertisement -

याअगोदरही वेश पालटून संसदेत आले आहेत

खासदार नरमल्ली शिवप्रसाद हे याअगोदरही अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी आंध्र प्रदेशच्या संस्कृतीतील पारंपारिक साडी नेसून संसदेत आले होते. त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते नारदमुनी पर्यंतचे वस्त्र परिधान करुन ते संसदेत आले होते. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला विरोध करताना शिवप्रसाद संसदेत अर्धा पांढरा आणि अर्धा काळा रंगाचा शर्ट परिधान करुन आले होते. शिवप्रसाद हे आंध्र प्रदेशच्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांपैकी एक आहेत.

आंध्र प्रदेशचा ‘सोंगाड्या’ खासदार

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून खासदार शिवप्रसाद वेगवेगळे वस्त्र परिधान करुन संसदेत आणि संसदेच्या बाहेर सरकारच्या विरोधात आंदोलन करतात. अभिनयाची कला अवगत असल्यामुळे या कलेच्या पुरेपूर वापर शिवप्रसाद करत असतात. विविध प्रकारचे सोंग करुन आंदोलन करणाऱ्यांपैकी शिवप्रसाद एक आहेत. सरकारच्या विरोधात आंदोलन करताना शिवप्रसाद यांनी जे सोंग केले त्यातील काही सोंगाचे ‘हे’ नमूने.

- Advertisement -
mp sivprasad
गुरे चारणाऱ्या शाळकरी मुलाचे सोंग करणाताना खासदार शिवप्रसाद

गळ्यात मंगळसुत्र, साडी आणि टिकली परिधान करुन शिवप्रसाद यांनी संसदेत आंदोलन केले होते. या आंदोलनत कॉंग्रेसच्या खासदार रेणूका चौधरीही सहभागी झाल्या होत्या.

TDP MP Mr N Shivprasad dressed as Telgu woman protests for special status for Andhra Pradesh
शिवप्रसाद यांच्या सोबत कॉंग्रेसचे खासदार रेणूका चौधरी

आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी शिवप्रसाद यांनी स्वतंत्र सेनानी अल्लूरी सीताराम राजू यांच्या वेशात आंदोलन केले होते.

shivprasad in alluri sitaram raju's costume
शिवप्रसाद जेव्हा धनुष्य बाण हातात घेऊन संसदेत येतात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -