घरताज्या घडामोडी'ही' शिक्षिका १३ महिन्यात झाली कोट्यधीश; कशी ती वाचा?

‘ही’ शिक्षिका १३ महिन्यात झाली कोट्यधीश; कशी ती वाचा?

Subscribe

एक शिक्षिका केवळ १३ महिन्यात शिक्षिका झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एकच शिक्षिका तब्बल २५ शाळांमध्ये शिकवणी घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या शिकवणीतून ही शिक्षिका केवळ १३ महिन्यांमध्ये कोट्यधीश झाली आहे.

असे झाले उघड?

नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अनामिका शुक्ला असे या शिक्षिकेचे नाव आहे. ही शिक्षिका उत्तर प्रदेशातील कस्तुरबा गांधी विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. दरम्यान, शुक्ला या इतर शाळेंमध्ये देखील शिकवणी घेत असल्याची कुणकुण रायबरेलीचे शिक्षण अधिकारी आनंद प्रकाश यांना लागली. त्यानंतर त्यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सहा जिल्ह्यांना पत्र पाठवले. त्यात अनामिका शुक्ला नावाची शिक्षिका तुमच्या शाळेत काम करते का, असे विचारण्यात आले होते. त्याचप्रमाणे तिचे तपशीलही मागवण्यात आले होते. त्यानुसार या पत्राला जेव्हा उत्तर आले, तेव्हा संपूर्ण विभागाला धक्काच बसला. कारण, जिल्ह्यांमध्ये असलेल्या २५ विद्यालयांमध्ये तिचे कंत्राटी तत्वावर पोस्टिंग झाल्याचे उघड झाले होते.

- Advertisement -

तसेच मागवण्यात आलेल्या यादीमध्ये प्रयागराज, आंबेडकर नगर, अलीगढ, सहारनपूर, बागपत येथील कस्तुरबा गांधी विद्यालय या नावाच्या शाळांचा समावेश होता. तसेच या शिक्षिकेला दर महिना ३० हजार रुपये वेतन देखील दिले जात होते. ते वेतन ती गेल्या १३ महिन्यांपासून घेत होती. विशेष म्हणजे, या वेतनांसाठी तिने एकच बँक अकाऊंट उघडले होते.

अशी लावली जायची हजेरी

विशेष बाबा म्हणजे ज्या शाळांमध्ये अनामिका शुक्ला ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिथे, ती वर्षभरापासून काम करत होती. तसेच जी हजेरी नोंदवावी लागते, ती प्रेरणा पोर्टल नावाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तत्वावर केली जाते. हजेरीवेळी वेगवेगळ्या संगणकांचे आयपी अॅड्रेसही आपोआप नोंद होतो, असे असूनही ती एकाच वेळी इतक्या ठिकाणाहून हजेरी कशी लावत होती, याचा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.

- Advertisement -

शिक्षिकेला केले निलंबित

याप्रकरणी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्याकडून बँकेची कागदपत्र मागवली असून त्याची पडताळणी केली जात आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे.


हेही वाचा – Coronavirus : २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोना रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -