बाबो! तरुणाला गेले दिवस; चौथा महिना सुरु

एका १८ वर्षाच्या तरुणाला चक्क दिवस गेले असून सध्या त्याला चौथा महिना सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

बाबो! तरुणाला गेले दिवस; चौथा महिना सुरु

जगात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्याची बाब अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेत एका १८ वर्षाच्या तरुणाला चक्क दिवस गेले असून सध्या त्याला चौथा महिना सुरु आहे. गेले काही दिवस या तरुणाला आपल्या शरीरात विचित्र बदल जाणवू लागले, तेव्हा त्यांनी डॉक्टरकडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टरांना देखील धक्का बसला.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार; अमेरिकेत राहणारा तरुण गरोदर असल्याचे समोर आले आहे. मायकी चॅनेल असे या तरुणाचे नाव आहे. सेक्स केल्यानंतर मायकीला शौचालयास त्रास जाणवत होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता एक विचित्र घटना समोर आली. मायकीच्या पोटात गर्भाशय आणि गर्भनलिका असल्याचे समोर आले आहे. तसेच मायकी सध्या चार महिन्यांचा गरोदर आहे. त्यांनी सांगितले आहे की, ‘जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या पालकांचा फार सहवास आपल्याला लाभला नाही. मात्र, आपण होणाऱ्या बाळाला आईचे प्रेम देऊ’, अशी भावना मायकीने व्यक्त केली आहे.

दरम्यान, मायकी चॅनेल या तरुणाचा जन्म २००२ साली अमेरिकेत झाला होता. जन्मापूर्वी मायकीच्या पालकांनी सोनोग्राफी केली होती. तेव्हा पोटात मुलगी असल्याचे निष्पन झाले होते. पण, जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा तेव्हा तो मुलगा निघाला होता. त्यामुळे मायकीचे आईवडील आश्चर्यचकित झाले होते.


हेही वाचा – ५०० शक्तिशाली संगणकांमध्ये भारताच्या परमसिद्धीची भरारी