तोकड्या कपड्यांमुळे वेश्या असल्याचा समज; जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या

मुलगी तोकडे कपडे घालते म्हणजे ती वेश्या व्यवसाय करते, असं समजून एका पती-पत्नी दाम्पत्याने पोटच्या मुलीची हत्या केली. मुलीच्या हत्येनंतर घरापासून ७० मैल लांब अंतरावर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट मुलीच्या पालकांनी केली.

London
teenage girl murder by her mother and father on doubt of Prostitute and short dress
तोकड्या कपड्यांमुळे वेश्या असल्याचा समज; जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या

तोकडे कपडे परिधान करणं म्हणजे अश्लीलता असं मानणारा समाज आजही या जगात अस्तित्वात आहे. आज जग पुरोगामी झाल्याचा कितीही दावा करत असलं तरी हा पुरोगामीत्वाचा फक्त आव आहे, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या युनायटेड किंगडममधील एका दाम्पत्याने पोटच्या मुलीला तोकडे कपडे घालते म्हणून हत्या केली आहे. या पती-पत्नी दाम्पत्याला आपली मुलगी तोकडे कपडे घालून वेश्या व्यवसाय करत असल्याचा संशय होता. या संशयातून मुलीची हत्या त्यांनी केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या मुलीचं नाव शेफिला अहमद असं होतं. ती १७ वर्षांची होती. तिचं राहणीमान तिच्या पालकांना खटकत होतं. त्यामुळे तिचे वडील इफ्तिखार मुहमदने तिची हत्या केली. यामध्ये मुलीच्या आईनेही मदत केल्याची बाब आता उघड झाली आहे. ही घटना २००३ साली घडली होती. मुलीच्या तोंडात प्लॅस्टिकची पिशवी कोंबून तिचं तोंड दाबण्यात आलं होतं आणि त्यातून तिचा मृत्यू झाला होता. यानंतर मुलीच्या वडिलांनी घरापासून ७० मैल लांब तिच्या मृतदेह फेकून दिला होता. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आपली मुलगी पळून गेली, असं या दाम्पत्याने पोलिसांना सांगितलं होतं. आता १५ वर्षांनी या घटनेची खरी बाब समोर आली आहे. मुलीच्या जवळचा मित्र-मैत्रिणींपैकी एकाने या घटनेचा खुलासा केला आहे. शानिन मुनीर असं या मित्राचे नाव आहे. त्याने सांगितलं की, शैफिलाचे आई-वडिल तिला वेश्या समजायचे. तिला वारंवार ते मारुन टाकण्याची धमकी द्यायचे. त्यानी बऱ्याचदा शैफीलाला मारहाण केली होती. त्यांच्या जाचा कंटाळून शैफीलाने घर सोडण्याचा निश्चय केला होता.