घरदेश-विदेशसमुद्रात बलात्कार झाला म्हणून आरोपीला सोडलं!

समुद्रात बलात्कार झाला म्हणून आरोपीला सोडलं!

Subscribe

बलात्काऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, अशी मागणी जगभरातून होत आहे. मात्र स्पेनमध्ये एका बलात्कार प्रकरणात आश्चर्यजनक निकाल समोर आला आहे. एका अल्पवयीन आरोपीला बलात्कार प्रकरणात चक्क सोडून देण्यात आले आहे. बलात्काराची घटना एमएससी डिव्हीना या क्रूझ शिपवर घडली, तेव्हा क्रूझ स्पेनमध्ये होती. त्यामुळे स्पॅनिश पोलिसांनी आरोपीला व्हॅलेन्सिया (स्पेन मधील शहर) कोर्टात हजर केले. मात्र ज्यावेळी हा गुन्हा घडला तेव्हा सदर क्रूझ ही स्पेनच्या न्यायक्षेत्राच्या बाहेर होती, त्यामुळे आरोपीला आम्ही शिक्षा देऊ शकत नाही, अशी भूमिका कोर्टाने घेतली आणि आरोपीला सोडून दिले. याबाबतचे वृत्त इंडपेंडट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

दरम्यान, पीडित मुलगी सुद्धा अल्पवयीन असून ती १७ वर्षांची ब्रिटिश नागरिक आहे. तर आरोपी इटालीयन नागरिक आहे. हा खटला सध्या स्पेनच्या कोर्टात सुरु आहे. मात्र २००९ साली स्पेनने आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसंदर्भात कायद्यात बदल केले आहेत. जर आरोपी किंवा पीडित या दोघांपैकी एकजण स्पेनमध्ये राहणारा असेल तरच आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची सुनावणी स्पेनमध्ये होऊ शकते. सध्या दोघेही स्पेनचे नाहीत आणि त्यातच ज्या क्रूझवर हा गुन्हा घडला ती क्रूझ देखील पनामा शहराची आहे.

- Advertisement -

कायद्याच्या या पळवाटेमुळे आरोपीला स्पेन शिक्षा देऊ शकत नसले तरी व्हॅलेन्सिया कोर्टाच्या न्यायाधीशांनी ब्रिटन, इटली किंवा पनामा शहरातील संबंधित यंत्रणेंने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच अल्पवयीन पीडितेची व्हॅलेन्सियाच्या ला फे हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. तसेच ज्या केबिनमध्ये बलात्कार झाला, तिथून डिएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. आरोपीची मुक्तता केल्यानंतर क्रूझने स्पेनमधून प्रस्थान केलेले आहे.

एमएससी क्रूझचे प्रवक्ते म्हणाले की, “या प्रकरणाचा तपास सुरु असून सध्यातरी याबाबत आम्ही अधिक काही बोलू शकत नाही. मात्र आम्ही या संदर्भात तपास यंत्रणेसोबत सहकार्य करत आहोत.” तर युकेचे परराष्ट्र आणि कॉमनवेल्थ कार्यालयाने सांगितले की, “आम्ही पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य देण्यासाठी तयार आहोत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -