खुशखबर! १७ ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस; आजपासून बुकिंग सुरु

LCD screens will be removed from tejas express as thief stole
'तेजस एक्सप्रेस'

कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र आता अनलॉकची सुरुवात होताच भारतीय रेल्वेच्या गाड्या हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. आयआरसीटीसीची मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस १७ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, सनिटायझर, फेस शिल्ड आणि हण्ड ग्लोव्हज असणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर २०२० पासून या गाडीचे आरक्षणही सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशने दिली आहे.

आयआरसीटीसीने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस कोरोनामुळे रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र आता दुर्गा पुजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणार्या प्रवाशांच्या मागणीनुसार तेजस एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार आयआरसीटीसी तेजस एक्सप्रेस चालविण्यासाठी सज्ज झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करता यावे याकरिता उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्केच आसन आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तसेच एकदा आसनस्थ झाल्यानंतर प्रवासी आपले आसन बदलु शकणार नाहीत. प्रवासादरम्यान प्रवासी आणि कर्मचारी यांनी मास्क आणि फेस कवर लावणे बंधनकारक आहे. कोचमध्ये प्रवेश करण्यापुर्वी प्रत्येक प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग आणि हातांची स्वच्छता करावी लागणार आहे. तसेच प्रवाशांचे सामान वारंवार सनिटाईज केले जाणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर २०२० पासून या गाडीचे आरक्षणही सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोरोना काळात मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –

तर श्रीमंत देशातून कोरोना सर्वात आधी जाणार; जाणून घ्या कारण