घरदेश-विदेशतेंलगणामध्ये १२ वीच्या निकालानंतर १९ विद्यार्थ्यांची आत्महत्या

तेंलगणामध्ये १२ वीच्या निकालानंतर १९ विद्यार्थ्यांची आत्महत्या

Subscribe

तेलंगणामध्ये नुकताच बॉर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (टीएसबीईई) चा बारावीचा निकाल लागला असून या निकालानंतर एका आठवड्यात १९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिक्षणाच्या मानसिक तणावाखाली तेलंगणामधील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये नुकताच बॉर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (टीएसबीईई) चा बारावीचा १८ एप्रिल रोजी निकाल लागला. या निकालानंतर २४ तासांत, दोन मुली आणि एका विद्यार्थ्यांनी परिक्षेत अपयक्ष आल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार एका आठवड्यात १९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्याआत्महत्येमध्ये वाढ होत असलेले पाहून पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाविषयीचा निषेध व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या तणाव

सामाजिक कार्यकर्तेंच्या म्हणण्यानुसार; विद्यार्थी शिक्षणाच्या तणावाखाली असल्यामुळे ते आत्महत्येचा विचार करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये सहा विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या तणावाखाली आत्महत्या केली होती. मात्र, २०१५, २०१६ आणि २०१७ यावर्षामध्ये एकाही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

३ लाख २८ हजार विद्यार्थी नापास

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. या वर्षी परिक्षेसाठी ९ लाख ७४ हजार विद्यार्थी परिक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २८ हजार विद्यार्थी नापास झाले असल्याचे समोर आले आहे.

कोण आहे आत्महत्येला जबाबदार?

तेलंगणा बॉर्डाने यावर्षी रजिस्ट्रेशन पासून ते परिक्षेच्या निकापर्यंत सर्व जबाबदारी ग्लोबरेना टेक्नोलॉजी (Globarena Technologies) या खासगी कंपनीला दिली होती. विद्यार्थी आणि पालकांच्या आरोपानुसार विद्यार्थ्यांनाचे गुण मोजताना गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अपयश आले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – …म्हणून प्रियांकाची जाऊ सोफी करणार होती आत्महत्या

वाचा – गळफास घेवून अल्पवयीन मुलीची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -