तेलंगना विधानसभा निवडणूक : शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा

तेलंगनामधील विधानसभेच्या निवडणुका शुक्रवारी पार पडणार आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. यादिवशी प्रचाराचा धुरळा उडाल्याचं पाहायाला मिळालं.

Hydrabad
Narendra modi-Rahul Gandhi

तेलंगनामधील विधानसभेच्या निवडणुका शुक्रवारी पार पडणार आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. यादिवशी प्रचाराचा धुरळा उडाल्याचं पाहायाला मिळालं. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे नेते आणि सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी, टीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी प्रचाराची राळ उडत शेवटचा दिवस गाजवला. तेलंगनामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आता प्रत्येक राजकीय पक्षामध्ये जोरदार स्पर्धा पाहायाला मिळाली. पण तेलंगनाची जनता कुणाच्या हाती सत्ता देणार हे निकालाअंती स्पष्ट होईल. आजचा शेवटचा दिवशी आरोप -प्रत्यारोपांनी गाजला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करत आता ख्रिस्तीयन मिशेल भारतात आला आहे. कोण कसं वाचतं ते मी पाहतो म्हणत गांधी परिवाराला लक्ष्य केलं. तर राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत नरेंद्र मोदी देशामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. तर,एमआयएमचे नेते आणि सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर देत मी देश सोडून का जाऊ? असा सवाल केला.

वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण ; मध्यस्ती क्रिश्चियन मिशेलला CBI कोठडी

घोटाळा, बेरोजगारी, राफेल करारांसारख्या मुद्यांचा तेलंगनाच्या प्रचारामध्ये प्रामुख्यानं वापर केला गेला. विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले गेले. राहुल गांधी यांनी प्रत्येक बेरोजगाराला महिना ३ हजार रूपये भत्ता दिला जाईल अशी घोषणा केली. शिवाय, तरूणांच्या शिक्षणासाठी देखील अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल अशी घोषणा केली. तेलंगना राष्ट्र समितीनं देखील यावेळी प्रचारामध्ये आघाडी घेत पुन्हा एकदा सत्ता द्या असं आव्हान जनतेला केलं. प्रचाराची उडालेली राळ पाहता जनता नेमकं कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे निकालाअंती स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here