घरदेश-विदेशतेलंगणात 'टीआरएस'च; भाजपाला नाकारले

तेलंगणात ‘टीआरएस’च; भाजपाला नाकारले

Subscribe

विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा टीआरएसचाच विजय होणार असल्याचे निष्कर्ष एक्झिट पोलनुसार समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा टीआरएसचाच विजय होणार असल्याचे निष्कर्ष एक्झिट पोलनुसार समोर येत आहे. दक्षिणेत भाजपाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतल्या. मात्र, एक्झिट पोलमध्ये तेलुगू जनतेनं पुन्हा एकदा टीआरएला कौल दिला आहे. तर, भाजापाला नाकारल्याचे चित्र समोर येत आहे. ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएसच्या चंद्रशेखर राव यांचीच सत्ता येईल. या सर्वेक्षानुसार केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला ६६ जागांवर विजय मिळेल. त्यामुळे ११९ संख्याबळ असलेल्या विधानसभेत ६६ जागांसह टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. तर भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेस आणि टीडीपी आघाडीला ३७ जागा मिळतील, असा अंदाज लावला जात आहे. तर इतर २ असा ११९ जागांसाठीचा हा एक्झिट पोल सर्व्हे आहे.

वाचा : ५ राज्यांमध्ये काँग्रेस आणणार भाजपच्या ‘नाकी दम’?

- Advertisement -

तेलंगणातील विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या टीआरएसने २०१४ साली सत्ता मिळवली होती. २०१४ साली तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. पण, काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत ११९ सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने ९०, काँग्रेस १३, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -