भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचे नाव मतदार यादीत नाही

भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिचे नाव मतदार यादीत नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्वालाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

Telangana
jwala gutta
भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा

राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला सुरुवात होताच सामान्य जनते बरोबर कलाकारही मतदान करत आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून निवडणुकांसाठी आयोगाने केलेली तयारीचा फज्जा उडाला आहे. तेलंगणात काही ठिकाणी इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे तर काही मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले असल्याचे चित्र आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचाही समावेश आहे. ज्वालाचे नाव मतदार यादीत नसल्याचे तिला समजले आहे. मतदान करण्यासाठी मतदार केंद्रावर गेल्यानंतर ज्वालाला ही माहिती मिळाली. ज्वालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा राग व्यक्त केला आहे. माझे नाव मतदार यादीतून गायब करण्यात आले असल्याचे ज्वालाने ट्विट केले आहे. ज्वालाच्या या ट्विटनंतर आयोगाचा ठेसळ कारोभार चव्हाट्यावर आला आहे.

ज्वालाने केलं ट्विट

मतदानाला सुरुवात

राजस्थान आणि तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मागच्या काही दिवसांपासून दोन राज्यामध्ये काँग्रेस, भाजप आणि टीआरएस या तीन पक्षांमध्ये जोरदार प्रचार सुरु होते. मतदानाला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here