घरट्रेंडिंगतेलंगणामध्ये सर 'कार' तेजीत; महाआघाडी मागे

तेलंगणामध्ये सर ‘कार’ तेजीत; महाआघाडी मागे

Subscribe

'टीआरएस'ला मिळालेल्या विजयावरुन, तेलुगू जनतेने पुन्हा एकदा केसीआर यांना मुख्यमंत्रीच्या रुपात कौल दिला असल्याचं म्हणता येईल.

तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकींचा आतापर्यंतचा निकाल पाहता, राज्यात के. चंद्रशेखर राव यांचं सर’कार’ तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. राव यांच्या टीआरएस पक्ष पुन्हा एकदा बहुमताने सत्ता स्थापन करणार अशी चिन्ह दिसत आहेत. एकीकडे देशात सुरू असणाऱ्या अन्य राज्यांतील निवडणुकींच्या निकालात सत्ता विरोधी लाट पाहायला मिळत असली, तरी तेलंगणात मात्र याच्या एकदम उलटं चित्र असून, राव यांच्या टीआरएसचं सरकार आघाडीवर आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद चंद्रशेखर राव यांनी ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे. ‘टीआरएस‘ला मिळालेल्या विजयावरुन, तेलुगू जनतेने पुन्हा एकदा केसीआर यांना मुख्यमंत्रीच्या रुपात कौल दिला असल्याचं म्हणता येईल. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा टीआरएसने मोठा विजय मिळवला आहे. वारंगल, मेदक आणि करीमनगर या जिल्ह्यात टीआरएस प्रामुख्याने आघाडीवर आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राव यांनी हैदरबादमधील पार्टी हेडक्वॉरटर्सला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व पार्टी कार्यकर्त्यांचे आभार मानले.


तेलंगणात टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. टीआरएस सध्या ८२ जागांवर आघाडीवर आहे. टीडीपी-काँग्रेस युतीला २५, भाजपा ६ तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएम सत्तेवर बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

- Advertisement -

ओवेसींचा सगल पाचवा विजय

हैदराबादमधून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांचा हा सगल पाचवा विजय आहे. ‘चंद्रयानगुट्टा’ या त्यांच्या मतदारसंघातून ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. अकबरुद्दिन ओवेसी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्वारावर बहुमताने मात केलं असून, त्यांच्या झोळीत एकूण ७३ हजार ९९२ मतांचं दान पडलं आहे. अकबरद्दिन ओवेसी हे १९९९ पासून एमाआयएम पक्षाकडून, ‘चंद्रयानगुट्टा’ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -