घरट्रेंडिंग'या' भारतीयासाठी डोनाल्ड ट्रम्प 'देव' !

‘या’ भारतीयासाठी डोनाल्ड ट्रम्प ‘देव’ !

Subscribe

'हा' भारतीय माणूस डोनाल्ड ट्रम्प यांचा भक्त आहे . ट्रम्प यांना आपला देव मानून तो त्यांची दररोज पूजा देखील करतो. का मानतो तो ट्रम्प यांना आपलं श्रद्धास्थान....

देव मानणे, त्याची पूजा-अर्चा करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक धारणा असते. जगभरातील लाखो लोक आपापल्या देवाची मनोभावे पूजा करत असतात. मात्र, जर कोणी एखाद्या माणसालाच देव मानून त्याची पूजा करत असेल तर? अर्थात ही बाब आपल्या देशात काही नवीन नाही. स्वत:ला देव म्हणवणारे अनेक भोंदूबाबा आजवर उघड झाले आहेत. मात्र, इथे प्रकरण थोडं वेगळंच आहे. तेलंगणामध्ये राहणारा हा एक अवलिया चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांची दररोज पूजा करतो. डोनाल्ड ट्रम्प यांना तो आपलं दैवत मानतो. जाणून घेऊया, यामागे दडलेलं नेमकं रहस्य.

‘तो’ आहे ट्रम्प यांचा भक्त

ट्रम्प यांना देव मानून त्यांची पूजा करणाऱ्या या माणसाचं नाव आहे बस्सा कृष्णा. कृष्णा तेलंगणाच्या जनगाव या खेड्यामध्ये राहतो. डोनाल्ड ट्रम्प यांना आपले श्रद्धास्थान मानणाऱ्या कृष्णाने नुकताच त्यांच्या तस्बीरावर दुधाने अभिषेक केला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतरच कृष्णा खऱ्या अर्थाने चर्चेत आला. कृष्णाने त्याच्या घरात डोनाल्ड ट्रम्पची फ्रेम ठेवली असून दररोज तो त्यांची पूजा करतो.

- Advertisement -

 

‘का’ मानतो ट्रम्प यांना देव?

डोनाल्ड ट्रम्प यांना देव मानण्याबाबात विचारणा केली असता कृष्णा सांगतो, ”डोनाल्ड ट्रम्प अतिशय धाडसी नेते आहेत. त्यांना आपल्या देशातील जनतेची नेहमीच काळजी असते. अमेरिकेतील लोकशाहीत त्यांना खूप विरोध झाला पण त्यांनी कायम जनेतच्या हिताचे निर्णय घेतले.” ट्रम्प यांना प्रत्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये जाऊन भेटण्याची इच्छा असल्याचेही, कृष्णा सांगतो.

- Advertisement -

 एक होता ‘हिटलर’चा पुजारी

अशाचप्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही माणसाला देव मानणारा एक अवलिया होता. जर्मनीचा हुकुमशाहा हिटलरची तो माणूस पूजा करत असे. हिटलरला तो आपला आदर्श मानायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -