घरCORONA UPDATELockdown: आंध्र प्रदेशमध्ये अडकलेल्या मुलासाठी आईने दोन दिवस चालवली दुचाकी

Lockdown: आंध्र प्रदेशमध्ये अडकलेल्या मुलासाठी आईने दोन दिवस चालवली दुचाकी

Subscribe

आंध्र प्रदेशमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी या आईने तब्बल १४०० किमीचा स्कूटरवरून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात सर्व नागरिकांना संचारबंदीचे नियम पाळायचे आहेत. त्यांनी घरात बसायचे आहेत, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र काही ठराविका कारणांसाठी लोकांना प्रवास करता येणार असल्याचेही सांगितले जात आहे. तेलंगणामध्ये असाच एक अनोखा प्रवास आईने आपल्या मुलासाठी केल्याचे पाहायला मिळाले. आंध्र प्रदेशमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी या माऊलीने तब्बल १४०० किमीचा स्कूटरवरून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊन असतानाही या आईने आपल्या मुलासाठी घराबाहेर पडून दोन दिवस स्कूर चालवून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास केल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

काय आहे घटना 

रजिया बेगम या ४८ वर्षीय महिलेने सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांच्या परवानगीने आपल्या दुचाकीवरून आंध्र प्रदेशमधील नेल्लोर शहराकडे प्रस्थान केले. तिथे अडकलेल्या आपल्याला मुलाला घेऊन रजिया बेगम दोन दिवसांनी म्हणजेच बुधवारी सायंकाळी १४०० किमीचा प्रवास करून तेलंगणामध्ये परतली. याबाबत रजिया यांनी सांगितले की, एका महिलेसाठी दुचाकीवरून आपल्याला मुलासोबत हा प्रवास करणे सोपे नव्हते. परंतू माझ्या इच्छाशक्तीसमोर ही भिती फोल ठरली. मी जेवण बांधले आणि नेल्लोरला जायला निघाले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर रहदारी नाही, कोणतीही वाहतुककोंडी नाही, तुरळक माणसंच दिसत होती, ही गोष्ट घाबरवणारी होती. मात्र माझा निश्चय पक्का होता. त्यामुळे मी प्रवास सुरूच ठेवला.

कसा अडकला नेल्लोरमध्ये मुलगा 

रजिया या हैदराबादपासून २०० किमीवर असलेल्या निजामाबाद येथील एका सरकारी शाळेत कार्यरत आहेत. साधारण १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा इंजिनिअरींगला असून दुसरा १९ वर्षाचा मुलगा निजामुद्दीनमध्ये शिक्षण घेत आहे. हा मुलगा १२ मार्च रोजी आपल्या मित्राला सोडण्याकरता नेल्लोरच्या रहमताबाद येथे गेला होता. मात्र काही दिवस तिथे राहिल्यानंतर लॉकडाऊन झाल्याने तो तिथेच अडकून पडला. त्यालाच घरी परत आणण्यासाठी रजिया बेगम यांनी हे मुलखा वेगळे धाडस केले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -