घरदेश-विदेशसिम कार्डसाठी होते आधार कार्डची मागणी

सिम कार्डसाठी होते आधार कार्डची मागणी

Subscribe

सिम कार्डसाठी आधार कार्डची गरज नसताना देखील टेलिकॉम कंपन्यांनकडून सिम कार्ड मागितलं जातं असल्याचे समोर आले आहे.

आधार कार्ड वैध की अवैध याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत होती. आधार कार्डच्या वैधतेला आवाहन देण्यावरुन गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु होते. मात्र, अखेर याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून अतिंम निर्णय देण्यात आला आहे. यामध्ये सिम कार्डसाठी आधार कार्डची गरज नसून ते मागितले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. मात्र असे असताना देखील टेलिकॉम कंपन्या मोबाईल सिमसाठी ई- केवायसी व्हेरिफिकेशनकरिता आजही आधार कार्डची मागणी करत असल्याचे आढळून आले आहे. कागदपत्रांसाठी अधिक वेळ वाया जातो त्यामुळे हा वेळ वाया जाऊ नये आणि ग्राहकांनाही सिम कार्ड लवकर मिळावं म्हणूनच सिम कार्ड देताना आधार कार्ड मागितलं जातं. असा दावा टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

आधार कार्ड न घेण्याच्या सूचना आल्या नाहीत

सिम देताना आधार कार्ड न घेण्याबाबतच्या कोणत्याही सूचना डिपार्ट अँड टेलिकॉमला अद्याप मिळालेल्या नसल्याचे टेलिकॉमच्या कंपन्यांमधील प्रतिनिधींनी ‘टाइम्य ऑफ इंडिया’ शी बोलताना म्हटलं आहे. जोपर्यंत सरकार यावर प्रतिबंध घालत नाही, तोपर्यंत ई – केवायसी आधारचा वापर केला जाईल. याप्रकरणी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमच्या निर्देशांची वाट पाहू, असं एका अधिकाऱ्याने सांगतिलं आहे. तर आम्ही डिपार्टमेंट अँड टेलिकॉमला याप्रकरणी सूचना दिल्या होत्या. त्यांनी हे प्रकरण निकाली काढणं अपेक्षित होते असे, युआयडीएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

टेलिकॉम कंपन्यांना दिल्या होत्या लिखित सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर युआयडीएआयने १ ऑक्टोबर रोजी याबाबत टेलिकॉम कंपन्यांना लिखित सूचना दिल्या होत्या. मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी किंवा व्हेरिफाय करण्यासाठी आधारचा वापर केला जाऊ शकत नाही असं सांगण्यात आले होते. तसेच हा प्लान १५ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करुन देण्यासही युआयकडून सांगण्यात आलं होतं. तसेच मोबाईल कंपन्या बेकायदेशीर अस काहीच करत नाहीत. त्यामुळे सध्या निकालपत्र वाचत असून मोबाईल कंपन्यांना निश्चित वेळ दिली गेली पाहिजे. जेणे करुन आधारला पर्याय म्हणून आम्हाला नवीन प्रक्रिया आणता येईल असं एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे.


वाचा – आधार खरोखर कोणासाठी?

- Advertisement -

वाचा – आधारकार्ड नसल्याने वृद्ध महिलेला एसटीमधून उतरवले

वाचा – आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -