घरदेश-विदेशकर्नाटकानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपात प्रवेश

कर्नाटकानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपात प्रवेश

Subscribe

गोव्यातील १० काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोव्याचे विरोध पक्षनेते देखील आहेत. त्यामुळे कर्नाटकाप्रमाणे गोव्यातही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये सुरु असेलेले राजकीय नाट्य ताजे असतानाच आता गोव्यामध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होत असल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यातील काँग्रेसचे १० आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत काव्लेकर यांचा देखील समावेश आहे. भाजपात प्रवेशासाठी काँग्रेसचे १० आमदार बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज हे सर्व आमदार भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घोणार आहेत.

10 Goa Congress MLAs that had merged with Bharatiya Janata Party (BJP), yesterday, arrive in Delhi along with Chief Minister Pramod Sawant. They will meet BJP President Amit Shah & Working President JP Nadda, later today. pic.twitter.com/emGVfxWN9c

- Advertisement -

— ANI (@ANI) July 11, 2019

- Advertisement -

आता भाजपची संख्या १७ वरुन २७ – गोव्याचे मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या माहितीचे समर्थन दिले आहे. त्यांनी सांगितले की, ‘काँग्रेसचे १० आमदार आपल्या विरोध पक्षनेत्यासह भाजपात सामील झाले आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपची संख्या २७ झाली आहे. भाजपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही, ते बिनशर्त भाजपात सामील झाले आहेत.’ त्याचबरोबर गुरुवारी कॅबिनेट विस्तारची घोषणा होऊ शकते, असेही ते म्हणाले.


हेही वाचा – सागरी पर्यटनासाठी गोवा पॅटर्न

हेही वाचा – बंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -