घरदेश-विदेशभारतात श्रीलंकेमार्गे घुसले ६ दहशतवादी; हाय अलर्ट जारी

भारतात श्रीलंकेमार्गे घुसले ६ दहशतवादी; हाय अलर्ट जारी

Subscribe

१५ ऑगस्ट आणि ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी केल्यानंतर आता पुन्हा एकदा जागोजागी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. आता श्रीलंकेमार्गे ६ दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती इंटेलिजन्सना मिळाली आहे.

स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट आणि ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी केल्यानंतर आता पुन्हा एकदा जागोजागी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. आता श्रीलंकेमार्गे ६ दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती इंटेलिजन्सना मिळाली असून ही दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे असल्याचे सांगितले जात आहेत. यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना हा अलर्ट पाठवण्यात आला. तामिळनाडूमध्ये शिरलेल्या दहशतवाद्यांमध्ये १ पाकिस्तानी आणि ५ श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम असल्याचे पाठवण्यात आलेल्या अलर्टमध्ये नमूद करण्यात आले. तसेच त्यांनी हिंदूंचा पेहराव केला असून ते राज्यभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिरं, पर्यटन स्थळ आणि परदेशी दुतावासावर हल्ला करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -