जम्मू-काश्मीर: कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी आसिफला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

Srinagar
terrorist Asif killed by indian army in kashmir
जम्मू-काश्मीर: कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये लष्कर-ए-तोय्यबाच्या कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. सुरक्षादलांना बुधवारी सकाळी सोपोरच्या एका भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सुरक्षादलाने शोध मोहिम सुरु केली. या मोहिमेत लष्कर-ए-तोय्यबाचा कुख्यात दहशतवादी आसिफला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. आसिफने सोपोरमध्ये फायरिंग केली होती. या फायरिंगमध्ये एका फळविक्रेत्याचा मृत्यू झाला होता. याशिवाय एका लहान बालिकेसह चार जण गंभीर जखमी झाले होते.

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या सोपरमध्ये दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये गोळीबार केला होता. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर एक लहान मुलीसोबत चार जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले गेले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील नागरिकांना धमकवणारी भित्तीपत्रकेही जागोजागी लावली होती. याप्रकरणी पोलिसांनी लष्कर-ए-तोय्यबाच्या आठ दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधाराच्या शोधात पोलीस होते. दरम्यान, सुरक्षादलाला सोपोरमध्ये अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम सुरु केली. या शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्यामुळे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोय्यबाचा अतिरेकी आशिफचा मृत्यू झाला. त्यामुळे जवानांना मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. सध्या सोपोरमध्ये शोध मोहिम सुरु असून लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु असल्याचे वृत्त मिळत आहे.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये ५० हजार रिक्त जागा भरणार; राज्यपालांची घोषणा