घरदेश-विदेशपुलवामा भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध!

पुलवामा भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध!

Subscribe

 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. अनेक देशांनी, या आणिबाणीच्या प्रसंगी आपण भारतासोबत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिका
अमेरीकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या हल्ल्यात ज्या जवानांना विरमरण आले त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी आम्ही भारताच्या कायम सोबत असल्याचा विश्वास अमेरीकेच्या संसद सदस्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्राचे महासचिव
हा हल्ला करण्यास भाग पाडणारे लोक कोण आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कठोर शासन झाले पाहिजे असे म्हणत संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी या घटनेचा निषेध केला.

फ्रान्स
फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्जेंड्रे जिगलर यांनीही ट्वीटरद्वारो या घटनेचा निषेध केला आहे.

- Advertisement -

रशिया
रशियाने या अमानवी कृत्याविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करायले हवे. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी जगभरातील राष्ट्रांनी एक व्हायला हवे. पुलवामा हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो”

जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्की
जर्मनीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या परिस्थितीत आम्ही भारत देशाच्या बरोबर असल्याचे जर्मनीने म्हटले आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया, तुर्की या देशांनाही या घटनेचा निषेध केला आहे.

श्रीलंका
भारताच्या शेजारील असणार्‍या श्रीलंकेनेही या घटनेवर निषेध व्यक्त करत दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.

इस्रायल
या कठीण काळात आम्ही मित्र राष्ट्र भारतासोबत आहोत. मृत्यूमुखी पडलेले सीआरपीएफ सैनिकांप्रती संवेदना व्यक्त करीत आहे.

बांग्लादेश
“या दुःखाच्या प्रसंगी आम्ही भारतातील जनता आणि सरकारसोबत आहोत. मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांप्रती संवेदना व्यक्त करतो तसेच जखमी सैनिक लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो”- शेख हसीना

भूतान
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. आम्ही सरकार आणि शहिदांच्या कुटुंबियांसोबत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -