जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर पुन्हा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग बसस्टॉपवर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला चढवला आहे. यामध्ये आत्तापर्यंत ५ जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे.

Anantanag

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे जखम अजूनही भरून आलेली नसताना आता पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरामध्ये मुख्य बस स्थानकावरच दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार सीआरपीएफचे ५ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यादरम्यान एका दहशतवाद्याला जेरबंद करण्यात जवानांना यश आलं आहे. बराच काळ या परिसरातल्या केपी रोडवर दहशतवादी आणि सीआरपीएफमध्ये गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here