घरदेश-विदेशजम्मू काश्मीर-पंजाब सीमेवर दहशतवाद्यांना अटक; सहा एके-४७ हस्तगत

जम्मू काश्मीर-पंजाब सीमेवर दहशतवाद्यांना अटक; सहा एके-४७ हस्तगत

Subscribe

पंजाबमधील बामियालहून काश्मीरच्या दिशेने जाणारा ट्रक जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी अडवला. यावेळी त्यांना या ट्रकमधून दहशतवादी शस्त्रांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

जम्मू काश्मीर-पंजाब सीमा रेषेवर जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना आज सकाळी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी सहा एके-४७ रायफल्स जप्त केल्या आहेत. लखनपूर येथे तैनात पोलिसांनी तपासणीसाठी ट्रक थांबवला असता दहशतवादी ट्रकमधून शस्त्रांची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा – उन्नावमध्ये हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; गावांना सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

अटक केलेल्यांची चौकशी सुरु

आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जम्मू-पठाणकोट हायवेवर तपासणीसाठी ट्रक थांबवण्यात आला होता. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये सहा एके-४७ रायफल्स सापडल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मकेश सिंह यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे हा ट्रक पंजाबमधील बामियालहून काश्मीरच्या दिशेने जात होता. अटक करण्यात आलेल्यांची सध्या चौकशी सुरु असून पोलीस या प्रकरणाचा आणखीन तपास करत असल्याचंही मकेश सिंह यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -