घरताज्या घडामोडीदहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ल्याचा निशाणा चुकला, एसएसबी जवान होते लक्ष्य

दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ल्याचा निशाणा चुकला, एसएसबी जवान होते लक्ष्य

Subscribe

दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर आज दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून यामध्ये सात नागरिक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असताना पुन्हा एकदा त्यांच्याकडून हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर आज शनिवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सात जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्राल येथील बसस्थानकावरील एसएसबी जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला होता. मात्र, त्यांचा हा निशाणा चुकला आणि त्या ग्रेनेडचा रस्त्यावरच स्फोट झाला. ज्यामध्ये सात नागरिक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

परिसर करण्यात आला सील

ग्रेनेड हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे हल्ला झालेला परिसर सील करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर, जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, याआधीही श्रीनगरमधील लावापोरा भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या २६/११चा मास्टरमाईंड झाकीर रहिमन लखवीला बेड्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -