घरCORONA UPDATEअमेरिका नौदल : नवीन लेझर शस्त्राची चाचणी; उडते विमान नष्ट करण्याची क्षमता

अमेरिका नौदल : नवीन लेझर शस्त्राची चाचणी; उडते विमान नष्ट करण्याची क्षमता

Subscribe

पॅसिफिक महासागरातील युद्धनौकावर ही चाचणी घेण्यात आली होती. हे शस्त्र इतके शक्तिशाली आहे की हे हवेत उड्डाण करणारे विमान नष्ट करू शकते, असे नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटने सांगितले.

अमेरिका नौदलाने हाय-एनर्जी लेझर शस्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पॅसिफिक महासागरातील युद्धनौकावर ही चाचणी घेण्यात आली होती. हे शस्त्र इतके शक्तिशाली आहे की हे हवेत उड्डाण करणारे विमान नष्ट करू शकते, असे नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटने सांगितले. दरम्यान, या चाचणीचे फोटो आणि व्हिडिओ नौदलाने शेअर केले आहेत. यात वॉरशिपच्या डेकमधून एक धारदार लेझर किरण बाहेर पडताना दर्शविला गेला आहे. व्हिडिओनुसार या लेझर किरणाचा सामना करणारा ड्रोन पेटू लागतो. नौदलाचे म्हणणे आहे की लेझर शस्त्रे ड्रोन किंवा शस्त्रासह लहान नौकावरही काम करू शकतात.

१६ मे रोजी पॅसिफिक महासागरात चाचणी

लेझर शस्त्राची चाचणी कोठे झाली, याची नौदलाने अद्याप माहिती उघड केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी पॅसिफिक महासागरात त्याची चाचणी घेण्यात आली. लेसर शस्त्राच्या सामर्थ्याविषयी देखील माहिती देण्यात आलेली नाही. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या २०१८ च्या अहवालात असे म्हटले आहे की, या शस्त्राची शक्ती १५० किलोवॅट असू शकते. पोर्टलँडचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन कॅरी सँडर्स म्हणाले की, यूएव्ही आणि छोट्या विमानांवर ही चाचणी करून आम्हाला या लेझर शस्त्राच्या सामर्थ्याविषयी बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. नवीन सामर्थ्याने आम्ही समुद्रावर युद्धाची नव्याने व्याख्या करीत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -