घरदेश-विदेशअविवाहित मुलींनी मोबाईल वापरला तर...

अविवाहित मुलींनी मोबाईल वापरला तर…

Subscribe

अविवाहित मुलींच्या मोबाईल वापरामुळे वडिलांना दीड लाखांचा दंड होणार आहे. तसेच आंतरजातीय विवाह केल्यास होणार दोन लाखांचा दंड.

२१ व्या शतकात मोबाईल हा लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. याच शतकात ठाकोर समुदायाने एक विचित्र असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या गुजरात राज्यात घेण्यात आला आहे. गुरातमधील दांतीवाडा येथे ठाकोर समुदायाने अविवाहित मुलींच्या मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाईल वापरला तर त्या मुलींच्या वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

ठाकुर समुदायाच्या बैठकीत १४ जुलै रविवारी जगोल गावात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत आंतरजातीय विवाहावरही बंदी घालण्यात आली. मुलींनी अभ्यासात लक्ष देण्यासाठी लॅपटॉप, टँबलेट घ्यावेत असे संदेश देखील देण्यात आला. मात्र जर ठाकोर समुदायातील मुलाने इतर जातीय मुलीसोबत लग्न केल्यास दोन लाखांचा दंडाचा नियम घेण्यात आला. तसेच अविवाहित मुलीने मोबाईल वापरला तर त्या मुलीच्या वडीलांना दीड लाखांचा दंड द्यावा लागणार आहे.

- Advertisement -

हे ठाकोर समुदायाचे नियम दनारी, मारपुरिया, शेरगढ, कोटडा, गागुडा, ओडवा, हरियावाडा, वेलावास, तालेपुरा, रतनपुर आणि रानडोल या गावांमध्ये लागू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा पंचायत समितीचे सदस्य जयंतीभाई ठाकोर असे म्हणाले की, हा निर्णय आमच्या समाजाच्या सर्व लोकांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. तसेच त्यांनी दहा दिवसानंतर अविवाहित मुलींच्या मोबाईल वापरण्याच्या निर्णयावर पुन्हा बैठक घेणार असल्याचे सांगितले. कुटु्ंबियांच्या मनाविरूद्ध मुलीने लग्न केल्यास हा गुन्हा मानला जाणार आहे. आर्थिक बचत करण्यासाठी लग्नात होणाऱ्या जास्त खर्चावर निर्बंध घालण्याकरिता फटाके आणि डीजे वापरण्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -