घरदेश-विदेश...म्हणून हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली

…म्हणून हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली

Subscribe

हार्दिक पटेलला जेव्हा वाटते तेव्हा तो गुजरात बंदची हाक देतो. तो आहे तरी कोण गुजरातचा हिटलर आहे का? असा सवाल तरुण गुजरने विचारला आहे.

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांची गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये प्रचारसभा झाली. या प्रचारसभे दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानाखाली मारली. तरुण गुजर या तरुणाने हार्दिक पटेल यांच्या कानाखाली मारली. असे कृत्य करण्यामागचे कारण त्याने सांगितले आहे. ‘हार्दिक पटेल यांनी ज्यावेळी पाटीदार समाजाच्या आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी मला अनेक समस्यांना समोरे जावे लागले होते. त्याचवेळी मी ठरवले होते की, मी या माणसाला मारणार, या माणसाला मी धडा शिकवणार असल्याचे मी ठरवले’, असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, दुसऱ्यांदा हार्दिक पटेल यांची अहमदाबादमध्ये मेळावा झाला. त्यावेळी माझा मुलगा आजारी होता. त्याला औषध आणण्यासाठी मी मेडिकलमध्ये गेलो होता. मात्र मेडिकल बंद होते. रस्ते बंद होते. हार्दिक पटेलला जेव्हा वाटते तेव्हा तो गुजरात बंदची हाक देतो. तो आहे तरी कोण गुजरातचा हिटलर आहे का? असा सवाल तरुण गुजरने विचारला आहे.

- Advertisement -

तरुण गुजर हा महेसाणा जिल्ह्यातल्या कडी तालुक्यामध्ये जेसलपूर गावामध्ये राहणारा आहे. ज्यावेळी पाटीदार समाजाचे आंदोलन झाले होते. त्यावेळी गुजरात बंद होते. आंदोलनावेळी रास्तारोको करण्यात आला होता. त्यावेळी या आंदोलनचा फटका अनेकांना बसला. या आंदोलनात १४ तरुणांची हत्या झाली होती. या हत्येला हार्दिक पटलेचं जबाबदार असल्याचे तरुणने सांगितले आहे.

हार्दिक पटेलला मारहाण | हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली

हार्दिक पटेलला भरसभेत मारहाण | #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 18, 2019

गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेत ही घटना घडली आहे. हार्दिक पटेल स्टेजवर भाषणासाठी उभे असताना अचानक स्टेजवर येऊन तरुण गुजर या व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुण गुजरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : भरसभेत तरुणाने हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात लगावली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -