घरट्रेंडिंगवय वर्ष १०५ असताना केरळच्या अम्माने दिली 'ही' परीक्षा!

वय वर्ष १०५ असताना केरळच्या अम्माने दिली ‘ही’ परीक्षा!

Subscribe

९ वर्षांची असताना तिसरीमध्ये अम्मा होत्या. मात्र परिस्थितीमुळे त्यांना पुढेच शिक्षण घेता आलं नाही.

चौथीची परीक्षा देणाऱ्या सर्वांत बुजुर्ग महिला म्हणून केरळमधील भागीरथी अम्मा ठरल्या आहेत. त्यांनी चक्क वयाच्या १०५व्या वर्षी इयत्ता चौथीची परीक्षा दिली आहे. यामुळे शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते हे भागीरथी अम्मा यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी इयत्ता चौथीची परीक्षा मंगळवारी दिली असून केरळच्या साक्षरता मिशनने दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या परीक्षा देऊ शकल्या.

जाणून घ्या भागीरथी अम्माबद्दल…

नेहमी अभ्यास करण्याची आणि ज्ञान वाढविण्याची जिद्द असणाऱ्या भागीरथी अम्मा यांच्या आईचे त्या लहान असतानाच निधन झाले. त्यानंतर लहान भाऊ आणि बहीणीची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी शिक्षण्याचे स्वप्न पाहणे सोडले. ७० वर्षांपूर्वीच भागीरथी अम्मा यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर चार मुलींसह दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर आली. त्यामुळे शाळेत जाण्याची इच्छा अर्धवट राहिली होती. त्यांना इयत्ता तिसरीत असताना शाळा सोडावी लागली. भागीरथी अम्माने आता ही इच्छा वयाच्या १०५ व्या वर्षी पूर्ण केली.

- Advertisement -

या’ विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यास लागले ३ दिवस!

वसंत कुमार यांनी पीटीआयला सांगितलं की, भागीरथी अम्माच्या लिखाणामध्ये अडचण येत होती. त्यामुळे पर्यावरण, गणित आणि मल्याळम या तीन विषयाच्या प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यास तिला ३ दिवस लागले. यामध्ये तिच्या लहान मुलीने तिला मदत केली. या वयात अम्माची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. डोळ्यांशी संबंधित तिला कोणतीही समस्या नाही. ९ वर्षांची असताना अम्मा तिसरीत होती. चौथीची परीक्षा दिल्याने अम्मा खूप खूश आहे. यापूर्वी ९६ वर्षीय कार्तिय्यानी अम्मा यांनी साक्षरता अभियानात आयोजित करण्यात आलेली परीक्षा दिली होती.


हेही वाचा – अखेर चांद्रयान-२ कसं कोसळलं ते समोर आलं!

- Advertisement -

 

एक प्रतिक्रिया

  1. अम्माची मुले किती वयाची आहेत ते बघा. नंतरच एकशे पाच वर्ष जाहीर करा.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -