प्रियांकाच्या वाढदिवशी ‘इंदिरा इज बॅक’ची घोषणा

Mumbai

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘इंदिरा इज बॅक’ची घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहिरातबाजी केली असून प्रियांका गांधी यांना माँ दुर्गाचा अवतार म्हटले आहे.

लोकसभेत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रियांका गांधी यांना सरचिटणीस सह संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यानंतर प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.

प्रियांका गांधी यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त मध्य प्रदेशसह अन्य राज्यात मोठ- मोठ्या जाहिराती देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. काही जाहिरातीतून ‘इंदिरा इज बॅक’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. या जाहिरातीवर भाजपने टीका केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here