घरदेश-विदेशलॉकडाऊन दरम्यानकेलेल्या कामांचा भाजप पंतप्रधानांना आढावा देणार 

लॉकडाऊन दरम्यानकेलेल्या कामांचा भाजप पंतप्रधानांना आढावा देणार 

Subscribe

कोरोना संक्रमण काळात देशभरात भारतीय जनता पक्षाने चालविलेले कार्यक्रम शनिवारी (४ जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले जानार आहेत. शुक्रवारी  पत्रकार परिषदेत भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी हि माहिती दिली. पक्षाच्या सर्व राज्य घटकांकडून डिजिटलच्या रूपाने हे सादरीकरण करण्यात येणार आहे.

सिंह यांनी वृत्तसंस्थेतील एएनआयला सांगितले, लॉकडाऊनमध्ये झालेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण शनिवारी सायंकाळी चार वाजता सर्व राज्यातील पक्षीय संघटनांकडून सादर केले जातील. हे नमो अॅपशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आमचे सर्व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहतील.सिंह म्हणाले की, या काळात केंद्र सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या असून या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना माहिती दिली आणि कोरोना संसर्ग टाळण्याचे मार्गही सांगितले. या दरम्यान, २२ कोटी लोकांना अन्न दिले गेले. यासह दोन कोटी ३० लाख मुखवटे आणि ८० लाख सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान भाजपचे अनेक खासदार आणि आमदार यांच्या निवासस्थानी फेस मास्क तयार करुन त्यांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण अण्णा योजनेंतर्गत जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अजूनही चालू आहे. ते म्हणाले की या काळात शहरांतून प्रवास करणाऱ्या कामगारांना मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि त्यांना आवश्यक वस्तू पुरविण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -