सहा जवानांना शौर्य चक्र

दहशतवादविरोधी कारवाईत यशस्वी कामगिरी

Delhi

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.यात देशाचे संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणार्‍या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. देशाच्या सुरक्षा करताना असामान्य कामगिरी बजावणार्‍या लष्करातील जवानांना शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०१९मध्ये कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांशी मुकाबला करत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सहा जवानांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केले. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याचबरोबर उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, लष्कराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह १९ अधिकार्‍यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.