माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हातोडा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला आहे. आधी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि आता बंगल्यावर हातोडा मारण्यात आला आहे.

Andhra Pradesh
The building was constructed by the previous government led by N Chandrababu Naidu
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हातोडा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला आहे. मंगळवारी रात्री प्रशासनाने प्रजा वेदिका पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी जिल्हाधिकारी आणि पोली, अधिक्षक यांची दोन दिवस बैठक झाली होती. या बैठकीनंतर प्रशासनाने इमारतीतील फर्नीचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवण्यात आली आहेत. सरकारच्या या कारवाईला विरोध करण्यासाठी तेलगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुरक्षा व्यवस्थेत कपात

तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मोठा झटका दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत देखील कपात करण्यात आली आहे. आधी त्यांची सुरक्षा काढून घेतली असून आता त्यांचा बंगला देखील पाडणार आहेत. नायडूंचा मुलगा नारा लोकेश यांची झेड श्रेणीची सुरक्षा काढून टाकण्याती आली आहे. माजी मुख्यमंत्री लोकेश यांची सुरक्षा ५५ वरुन २२ अशी करण्यात आली आहे.

रेड्डींना लिहले होते पत्र

तेलगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांचे निवासस्थान असलेल्या प्रजा वेदिकाची निर्मिती गेल्या वर्षी करण्यात आली होती. या निवासस्थानाचा वापर सरकार आणि पक्षाच्या कामकाजासाठी करण्यात येत होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला होता. या पराभवानंतर नायडू यांनी ५ जून रोजी मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांना पत्र लिहले होते. नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना विनंती केली होती की, प्रजा वेदिकाचा वापर निवासस्थान म्हणून करण्याची परवानगी द्यावी. तसेच प्रजा वेदिकाचा वापर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना भेटण्यासाठी करायचा असल्याचे नायडू यांनी पत्रात लिहले होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांच्या बंगल्यावर हातोडा मारण्यात आला.


हेही वाचा – शपथविधीला वडिलांच्या आठवणीचे भावूक झाले जगनमोहन रेड्डी

हेही वाचा – राजघाटवर मानवंदना देऊन नायडूंनी केली उपोषणाला सुरुवात