घरताज्या घडामोडीमुलींचे आई होण्याचे वय ठरवणार मोदी सरकार, घेतला हा निर्णय!

मुलींचे आई होण्याचे वय ठरवणार मोदी सरकार, घेतला हा निर्णय!

Subscribe

टास्कफोर्सचे मुख्य कार्य स्त्रिया आणि त्यांच्या मुलाचे आरोग्याचा अभ्यास करून मातृत्व आणि विवाहचे योग्य वय याचा आढावा घेणं आहे.

मुलींच्या लग्नासंबंधित मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलींच्या आई बनणे आणि त्यांच्या लग्नासंबंधित हा निर्णय असणार आहे. जया जेटली यांच्या नेतृत्वात सरकारनं एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या निर्णयामुळे टास्क फोर्सने मुलींमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे. सध्या मुलींच्या विवाहासाठी किमान वय १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. पण आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

टास्कफोर्सचे मुख्य कार्य स्त्रिया आणि त्यांच्या मुलाचे आरोग्याचा अभ्यास करून मातृत्व आणि विवाहचे योग्य वय याचा आढावा घेणं आहे. तसेच, असे मानले जाते की केंद्राद्वारे गठित टास्क फोर्स मुलींच्या लग्नाच्या वयाचा आढावा घेईल. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मुलीचे लग्नासाठी वय वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्स ३१ जूलैला आपला अहवाल सादर करेल. टास्क फोर्समध्ये डॉ. व्ही.के. पॉल, सदस्य (आरोग्य) एनआयटीआय आयोग, उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास सचिव, जया जेटली यांच्याशिवाय शिक्षणतज्ज्ञ नजमा अख्तर, वसुधा कामत आणि दीप्ती शाह यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सध्या मुलींचे वय १८ वर्षे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या आधी एका भाषणात याविषयी उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, आई होण्यासाठी योग्य वयाबद्दल महिलांना सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय सरकारच्या या निर्णयाला कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने लग्नासाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय सरकारवर सोडला होता. त्यामुळे आता टास्क फोर्सच्या या निर्णयानंतर मुलींच्या लग्नाच्या वयात बदल होऊ शकतो. जर लग्नाच्या वयात बदल झाला तर आपोआपच मुलीचे आई होण्याचे वयातही बदल होईल.


हे ही वाचा – सोनू सूदच्या नावाने होत आहे फसवणूक; ट्विट करत केले सावध

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -