घरदेश-विदेशकेंद्र सरकार करणार सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्यांचे खासगीकरण; वाचा यादी

केंद्र सरकार करणार सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्यांचे खासगीकरण; वाचा यादी

Subscribe

देशाची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली असताना कोरोनाच्या संकटाने अर्थव्यवस्थेचं पार कंबरडं मोडलं. नुकताच देशाचा आर्थिक विकास दर जाहीर झाला. या दरामुळे देशासमोरील आर्थिक संकट किती गडद आहे हे दिसून येतं. देशाची परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून (PSUs) सरकार आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. याचसंदर्भात २७ जुलै २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ कंपन्यांचे खासगिकरण करणार असल्याची माहिती दिली होती. या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदीलही मिळाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सरकार नक्की कोणत्या कंपन्यांमधील हिस्सेदारी विकणार आहे याबद्दलची कोणतीही माहिती दिली नव्हती. दरम्यान, आता सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ नाही तर २६ कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकारातून कोणत्या कंपन्यांचं खासगीकरण केलं जाणार आहे, याची यादी देखील मिळाली आहे. सर्व २६ कंपन्यांच्या नावाबरोबरच कंपन्यांमध्ये असणारा सरकारी मलकीचा किती हिस्सा विकला जाणार आहे हे कंपनीच्या बाजारमुल्यावर अवलंबून असणार आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे.

- Advertisement -

1. Project & Development India Limited (PDIL)
2. Engineering Projects India Limited (EPIL)
3. Pawan Hans Limited (PHL)
4. B&R Company Limited (B&R)
5. Air India

6. Central Electronics Limited(CEL)
7. Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)
8. Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)
9. Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plant
10. Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)

- Advertisement -

11. Nagarnar Steel Plant of NDMC
12. Bharat Earth Movers Limited (BEML)
13. HLL Lifecare
14. Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)
15. Shipping Corporation of India Ltd. (SCI)

16. Container Corporation of India Ltd (CONCOR)
17. Nilachal Ispat Nigam Limited (NINL).
18. Hindustan Prefab Limited (HPL)
19. Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)
20. Scooters India Ltd (SIL)

21. Hindustan Newsprint Ltd (HNL)
22. Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)
23. Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)
24. Hindustan Antibiotics Ltd. (HAL)
25. Indian Tourism Development Corporation (ITDC)
26. Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -