घरCORONA UPDATEमुलाच्या टाईमपासने वाढवला मनस्ताप; कुटुंबावर आली विलगीकरणात राहण्याची वेळ!

मुलाच्या टाईमपासने वाढवला मनस्ताप; कुटुंबावर आली विलगीकरणात राहण्याची वेळ!

Subscribe

कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सरकारने ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप तयार केलं आहे. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी सराकर सतर्क आहे. दररोज काही ना काही उपाययोजना राबवत आहे. याचच उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच वर्धा जिल्ह्यात घडलेली घटना. एका लहान मुलीच्या चुकीमुळे संपूर्ण कुटपंबावर क्वारंटाईन होण्याची वेळ आली. आरोग्य सेतू अपवर सगळ्या प्रश्नांची उत्तर होकारार्थी दिल्यामुळे या मुलासह संपूर्ण कुटुंबाला सात दिवस विलगीकरणात रहावं लागलं.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका कुटुंबात ही घटना घडली. कुटुंबातील दहा वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा मोबाईल घेतला. त्यानंतर त्याने मोबाईलमधील सर्व अ‍ॅप उघडण्यास सुरूवात केली. यातील आरोग्य सेतू अ‍ॅप देखील त्याने उघडले. त्यानंतर त्यातील सर्व प्रश्नांचे होय असे उत्तर दिले आणि घोटाळा झाला. या अ‍ॅपचे दिल्ली कनेक्शन असल्याने सुत्रं जलगतीने हलली व तेथून राज्यातील प्रशासनास सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा पातळीवर ही सूचना आल्यानंतर संबंधित घरी शासकीय कर्मचारी पोहोचले.

- Advertisement -

त्यानंतर आपल्या मुलाचा प्रताप वडिलांना समजला. दारात आलेले कर्मचारी पाहिल्यावर व त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून ते चकीत झाले. आमच्या घरात सर्वजण ठणठणीत असल्याचे त्यांना कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितले. मात्र, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच म्हणणं मान्य केलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याची वेळ आली. त्यामुळे आपल्या मुलाचा टाईमपास कुटुंबाला मात्र चांगलाच भोवला.


हे ही वाचा – कोरोना रूग्णाला वॉर्डमध्ये कुत्र्याबरोबर ठेवून कर्मचारी गायब!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -