घरCORONA UPDATECorona: चिंताजनक! देशात मृतांचा आकडा शंभरीपार; तर रुग्णांची संख्या ४ हजारांवर

Corona: चिंताजनक! देशात मृतांचा आकडा शंभरीपार; तर रुग्णांची संख्या ४ हजारांवर

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता देशामध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या शंभरीपार गेली आहे.

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरीपार गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १०९ जणांना या आजारामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या ही ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी एक पत्रक जारी केले असून यामधील आकडेवारीनुसार देशात आता ४ हजार ०६७ कोरोनाबाधित झाले आहेत. तर ३ हजार ६६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २९१ रुग्ण बरे झाले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला केलं गोळ्या घालून ठार!

१२ तासांत ४९० रुग्ण वाढले 

गेल्या १२ तासांमध्ये देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४९० ने वाढला आहे. भोपाळमध्ये कोरोना व्हायरसमुळे ६२ वर्षीय वृद्धाचा रविवारी रात्री मृत्यू झाला असून आज सकाळी महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातही एका रुग्णाच्या मृत्युची माहिती समोर येत आहे. तसेच जगभरात कोरोनाने २०९ देशांना ग्रासले असून यामध्ये ११ लाख ३६ हजार ८५१ कोरोनाबाधितांची संख्या समोर येत आहे. तर ६२ हजार ९५५ लोकांनी आत्तापर्यंत आपला जीव गमावला आहे. ही माहिती WHO च्या सहाय्याने देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -